जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यात पाच तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातून आज ६४ रूग्ण बाधित असल्याचे दिसून आले आहे. तर ९१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
आजची आकडेवारी
जिल्हा प्रशानाकडून आलेल्या आकडेवारीत पाचोरा, भडगाव, एरंडोल, चाळीसगाव आणि मुक्ताईनगर तालुक्यात रूग्ण निरंक आले आहेत. तर जळगाव शहर-२८, जळगाव ग्रामीण-४, भुसावळ-९, अमळनेर-५, चोपडा-६, धरणगाव-१, यावल-१, जामनेर-२, रावेर-१, पारोळा-२, बोदवड-३ इतर जिल्ह्यातील रुग्ण २ असे एकुण ६४ रूग्ण बाधित आढळून आले आहे.
जिल्ह्यात एकुण ५३ हजार ३२९ रूग्ण बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५१ हजार ३६७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ६९३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज एकही रुग्ण दगावला नसून एकुण १ हजार २६९ रूग्णांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातील रिकव्हरी रेट हा ९६.३२ टक्क्यांवर येवून पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.