जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून ५७ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे तर ३७ रूग्ण कोरोनामुक्त झालेत. आजच्या अहवालात चार तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर- १३, जळगाव ग्रामीण- ६, भुसावळ-७, अमळनेर-१, चोपडा-३, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-२, यावल-०, एरडोल-१, जामनेर-१, रावेर-३, पारोळा-२, चाळीसगाव-०, मुक्ताईनगर-१५, बोदवड-० आणि इतर जिल्हीतील २ असे एकुण ५७ रूग्ण कोरोना बाधित आढळून आलेते.
आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकुण ५४ हजार २३४ रूग्ण संख्या झाली आहे. यापैकी ५२ हजार ४८४ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर ४६० रूग्ण उपचार घेत आहे. आज एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकुण १ हजार २९० रूग्णांचा मृत्यू झाला. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे.