Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज ४६ रूग्ण बाधित आढळले; ३६ रूग्ण झाले बरे

कोरोना : जिल्ह्यात आज ४६ रूग्ण बाधित आढळले; ३६ रूग्ण झाले बरे

0
32

 

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या आजच्या अहवालातून जिल्ह्यात ४६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ३६ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज ५ तालुके निरंक आल्याचे दिसून आले आहे.

आजची आकडेवारी

जळगाव ग्रामीण, अमळनेर, भडगाव, मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यातील रूग्ण संख्या निरंक आली आहे. तर जळगाव शहर- २१, भुसावळ-६, चोपडा-५, पाचोरा-२, धरणगाव-१, यावल-१, एरंडोल-१, जामनेर-१, रावेर-२, पारोळा-३, चाळीसगाव-३ असे एकुण ४६ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील रूग्ण संख्या ५५ हजार ४०१ बाधित रूग्ण आढळले आहे. यातील ५३ हजार ७२१ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर ३६१ रूग्ण विविध कोवीड सेंटरला उपचार घेत आहे. आज दोघा बाधित रूग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.


Protected Content

Play sound