कोरोना : जिल्ह्यात आज ३ संक्रमित रूग्ण आढळले; ५ रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकुण ३  बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ५  रूग्ण कोरोनामुक्त झाली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रान्वये कळविले आहे. 

 

अहवालानुसार केवळ जळगाव शहरात ३ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर उर्वरित सर्व तालुका निरंक असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ६७८  कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ७५  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २८  बाधित रूग्ण जिल्ह्यातील विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आजवर  जिल्ह्यात एकुण २ हजार ५७५ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

 

Protected Content