जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यातून ३९ रूग्ण बाधित आढळून आले आहे. तर ५५ बाधित रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यातील पाच रूग्ण निरंक असल्याचे दिसून आले आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-५, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-७, अमळनेर-४, चोपडा-२, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-२, जामनेर-१, रावेर-४, पारोळा-२, चाळीसगाव-६, मुक्ताईनगर-०, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण ३९ रूग्ण बाधित आढळले आहे.
आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकुण ५५ हजार १६० बाधित रूग्ण आढळले आहे. यापैकी ५३ हजार ४८२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे तर ३६३ रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आज जळगाव शहरातील एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाकडून कळविण्यात आले आहे.