जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यातून ३५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ४१ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आज तिन तालुके निरंक दिसून आले आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-८, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-७, अमळनेर-५, चोपडा-२, पाचोरा-२, भडगाव-१, धरणगाव-१, यावल-१, एरंडोल-२, जामनेर-२, रावेर-२, पारोळा-१, चाळीसगाव-०, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ३५ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
आजच्या आलेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात एकुण ५६ हजार १२४ बाधित रूग्ण आढळले होते. त्यापैकी आत्तापर्यंत ५४ हजार ३१७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ४७४ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. तसेच आज दोन रूग्णाचा मृत्यू झाला असून एकुण १ हजार ३३३ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.