जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात दोन बाधित रूग्ण आढळून आले. तर तीन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
जळगाव जिल्ह्यात कोवीड अहवालानुसार जळगाव शहर १ व जामनेर १ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्हा रूग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ६६१ बाधित रूग्ण आढळून आले तर १ लाख ४० हजार ५७ हजार रूग्ण बरे होवून घरी परतले. तर २९ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.