जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवाल जिल्ह्यात एकुण २९ कोरोना पॉझिटीव्ह आढळले असून आज २३ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहेत. आज दहा तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहेत.
आजची आकडेवारी
जळगाव शहर- २२ , जळगाव ग्रामीण- ०, भुसावळ- ०, अमळनेर- १, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-१, जामनेर-०, रावेर-२, पारोळा-१, चाळीसगाव-२, मुक्ताईनगर- ०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ० असे एकुण २९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकुण ५७ हजार ४६७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५५ हजार ७२९ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून ३७२ रूग्ण उपचार घेत आहे. आज भुसावळच्या एक आणि बोदवडचा दुसरा अशा दोन रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पत्रकान्वये कळविली आहे.