जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून २२ रूग्ण बाधित आढळून आले असून ४४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज सहा तालुक्यातील आकडेवारी निरंक असल्याचे दिसून आले आहे.
आजच्या आकडेवारीनुसार
जळगाव शहर-५, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-२, अमळनेर-०, चोपडा-४, पाचोरा-२, भडगाव-०, धरणगाव-२, यावल-१, एरंडोल-३, जामनेर-०, रावेर-१, पारोळा-०, चाळीसगाव-२, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण २२ रूग्ण आढळून आले आहे
जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यात ५६ हजार ८१३ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५५ हजार ११ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ४५१ रूग्ण विविध कोवीड सेंटरला उपचार घेत आहे. आज एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविली आहे.