जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात ७ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ३३ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
जळगाव शहर-२, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-१, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-२, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-१, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ७ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ४३१ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ५७१ कोरोनामुक्त झाले आहे. तर २८६ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात ११ तालुके निरंक आढळून आले आहे.