जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरातून एकही बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
जळगाव जिल्ह्यात आज रविवारी ७ नोव्हेंबर रोजी दिवसभरात एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. आता जिल्ह्यात ८ बाधित रूग्ण असून उपचार घेत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७८३ बाधित रूग्ण आढळून आले त्यापैकी १ लाख ४० हजार १९८ रूग्ण बरे होवून घरी परतले. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.