जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात दोन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत . तर एक रूग्ण बरा होवून घरी परतले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्हा कोवीड रूग्णाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात भुसावळ तालुक्यात दोन रूग्ण आढळले आहेत. तर एक रुग्ण बरा झाला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ७५७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १६९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर सध्या १२ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.


