कोरोना : जिल्हा रूग्णालयात आज ६ जण संशयित म्हणून दाखल

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आज नवीन ६ रूग्णांना दाखल करण्यात आले आहे. आत्तापर्यंत ७७ जणांना उपचारार्थ दाखल केले असून त्यातील ६७ रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे तर ७ जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहे. आत्तापर्यंत एका रूग्ण कोरोना संक्रमित आहे.

दोन दिवसांपुर्वीच एक रूग्णाला कारोना संकमित असल्याने जिल्हा खळबळीने जागा झाला होता. दिवसंदिवस कोरोना संशयितांची आकडा हा वाढत आहे. दरम्यान दोन दिवसांपुर्वी आढळून आलेल्या रूग्णामुळे जळगावातील मेहरूण परीसर बंदी करण्यात आली आहे. एक रूग्ण आढळून आल्यानंतर शहरातील विविध भागात सामाजिक संस्था, वयक्तिक आणि इतरांकडून जंतूनाशक फवारणी करण्यात येत आहे. यात तरूण वर्ग हिरारीने भाग घेत आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकुण स्क्रिनिंग आपडीमध्ये एकुण १८९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास एका संशयित रूग्णाचा कोरोना कक्षात मृत्यू झाला होता. त्या रूग्णाला मेडीकल अहवाल अद्याप प्रलंबित असून उद्या सायंकाळपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान आज जिल्हा वैद्यकिय महाविद्यालया कोरोनाचे लक्षणानुसार ६ रूग्णांना कोरोना कक्षात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. आत्तापर्यंत ७७ जणांच्या रिपोर्ट पैकी ६७ जणांना कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले तर ७ जणांचे मेडीकल रिपोर्ट प्रलंबित असून १ रिपोर्ट संक्रमित तर दोन रिपोर्ट रिजेक्ट करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Protected Content