जळगाव प्रतिनिधी । जिल्हा वैद्यकिय शासकीय महाविद्यालयात १८ रोजी दाखल असलेल्या ५२ वर्षीय महिला रूग्णाचा आज २० रोजी मृत्यू झाला आहे. संशयित रूग्णाचे स्वॅब धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात पाठविण्यात आला असून अद्याप तपासणी अहवाल आलेला नाही. रविवारी देखील अमळनेर येथील एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्या महिलेचा देखील अद्याप तपासणी अहवाल आलेला नाही.
याबाबत माहिती अशी की, ५२ वर्षीय मयत कोरोना संशयित वृध्द महिलेला किडनीचा त्रास तसेच निमोनियामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने १८ रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयातील आयसीयूत कक्षात दाखल करण्यात येवून या ठिकाणी उपचार सुरु होते. रविवारी या महिलेच्या स्वॅबचे नमुने घेत ते तपासणीसाठी धुळे येथे पाठविण्यात आले असतांना २० रोजी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
नवीन ११ संशयितांच्या रिपोर्टची प्रतिक्षा
दरम्यान, २० रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयतील कोविड १९ कक्षात नवीन २० संशयित दखल करण्यात आले असून त्यांच्या काहींचे स्वॅब तपासणीसाठी धुळे येथे पाठविण्यात आला आहे. तर शासनाच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे काहींचे स्वॅब दाखल झाल्यानंतर पाच दिवसांच्या आत घेण्याचा सुचना असल्याने २२ पर्यंत उर्वरीत संशयितांचे स्वॅब घेण्यात येणार आहे. त्यानुसार नवीन व पुर्वीचे असे एकूण ११ जणांच्या स्वॅबचा अहवाल सध्या प्रलंबित आहे. तर ११० जणांची स्क्रिनिंग करण्यात येवून आतापर्यंत एकूण ४ हजार ३३९ जणांची स्क्रिनिंग झाली आहे.