नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसमुळे जगभरात आतापर्यत २७,३७०हून अधिक लोकांना मृत्यू झाल्यामुळे हाहाकार उडाला आहे. दरम्यान, जगात कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
इटलीत कोरोनामुळे ९१३४ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. चीनमध्ये ३२९५, अमेरिकेत १७०४, स्पेनमध्ये ५१३८, इराणमध्ये २३७८, फ्रान्समध्ये १९९५, जर्मनीमध्ये ३९१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत २७,३७० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ५,९७,४५८ लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर १,३३,३७३ लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.