मुंबई (वृत्तसंस्था) घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही. हे ‘वॉर अगेन्स व्हायरस’ आहे. आपण खबरदारी घेत आहात, पण आणखी खबरदारी घ्यायला हवी. लोकांनी घरातून बाहेर पडू नये. सरकारने दिलेल्या सुचना पाळून लोकांनी गर्दी कमी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला.
कोरोना विरुद्धच्या या युद्धात तुमचे सगळ्यांचे सहकार्य हे सरकारचे बळ आहे. या युद्धाचा मुकाबला करताना आपले सरकार म्हणजेच यंत्रणा सज्ज आहे. यंत्र आणि यंत्रणा यातील फरक लक्षात घ्यावा. आपल्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे. कोणीही घाबरून चालणार नाही. यंत्रणेवरचा भारही कमी करणे आपले काम. यंत्रणेचे काम सुरू ठेवणे आपल्या हातात असते. ती सुद्धा माणसं आहेत, कोणाचे कुटुंबीय आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. सरकारने दिलेल्या सर्व सुचना नागरिकांनी पाळाल्या पाहिजे. संकटाला जात धर्म नसतो. एकजुटीने आपण याविरोधात लढायला हवे. तसेच कोरोना हा विषाणू एकेक पाऊल पुढे टाकतोय. रुग्णांची संख्या वाढत आहे. काळजी घ्यावीच लागणार, असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news