यावल प्रतिनिधी । तीन दिवसांपुर्वी तालुक्यातील दहीगाव येथे कोरोनाग्रस्त ट्रकचालकाच्या संपर्कात आल्याने गावात व परीसरात गोंधळ उडाला होता. मात्र गावातील नागरीकांना गावाचा रस्ता सर्वांसाठी बंद करण्यात आला आहे. दीड वर्षापासून दारूमुक्त असलेल्या दहीगावकरांसाठी इतर गावांनी रस्ता आडवून धरले आहे. त्यामुळे तळीरामांना आता दारूसाठी इतर गावात जाण्यासाठीचे सर्व रस्ते बंद केले आहे.
लॉकडाऊन काळात यावल तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांची दांडी
तालुक्यातील दहीगाव येथे तीन दिवसापूर्वी कोरोना संसर्गजन्य वाहनचालकाच्या संपर्कात आल्याने काही मजूरांना आरोग्य विभागाने गावातून कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी तात्काळ दक्षता घेऊन त्या मजुरांना कोरेनटाईन करण्यात आले आहे. गावात व परिसरात एकच गोंधळ झाला होता म्हणून दहिगाव गावाच्या आजूबाजूला असलेले सावखेडा सिम व कोरपावली या गावाने दहीगावकरांना आपल्या गावात प्रवेश मिळू नये म्हणून काटेरी झुडपे टाकून गावातील प्रमुख मार्ग बंद करण्यात आले होते. दरम्यान सावखेडा सिम व कोरपावलीच्या नागरिकांनी अशाप्रकारे दहिगावकरांची गावात प्रवेश बंद केल्याने अनेक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
शेंदुर्णीत लॉकडाऊनची ऐसीतैशी; प्रत्येक बुधवारी भरतोय आठवडे बाजार
दहिगावकरांच्या या गाव प्रवेश बंदीमुळे सावखेडा सिम येथील नागरीकांना आवश्यक असलेली प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच बँकिंग व्यवहार व शेती कामकाज पूर्णपणे बंद पडली होती नागरिकांच्या या समस्या लक्षात घेता सावखेडा सिम येथील व दहिगावच्या ग्रामपंचायतींनी व लोकप्रतिनिधी प्रतिनिधींनी समन्वयाची भूमिका साधून काल दुपारच्या वेळेला हा बंद केलेला रस्ता दहिगावकरांसाठी पूर्वरत केला असून दहिगावकरांनी सावखेडा सिम व दहिगाव च्या ग्रामपंचायत सरपंच व गावातील पोलीस पाटील लोकप्रतिनिधी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. दरम्यान यासंदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता दहिगावातील महिलांच्या पुढाकाराने गेल्या एक-दीड वर्षापासून दारूमुक्त झाले असून शेजारचे सावखेडा सिम व कोरपावली गाव हे गावठी दारूपासून ते सर्व प्रकारच्या दारू विक्रीचे केंद्र बनले आहे. या दोघे गावामध्ये सकाळी व रात्री उशिरापर्यंत सर्रासपणे शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून खुलेआम दारू विक्री करण्यात असल्याने तळीरामांना आपला मोर्चा या गावांकडे वळवला असल्याने या वाढती गर्दीमुळे महिलांना याचा त्रास होत असल्याकारणाने सदाची हे गाव बंदीचे घेण्यात आल्याचे कळते या सर्व विषयावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गंभीर दखल घेऊन तात्काळ अशाप्रकारे होत असलेली दारू विक्री बंद करावी, अशी मागणी महिलावर्गाकडून करण्यात येत आहे.