खामगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासकीय यंत्रणा परिश्रम घेत आहेत. तेथे एक पाऊल पुढे येत शहरातील मेडिकल दूध डेअरीसमोर होणाऱ्या गर्दीतून संसर्ग टाळण्यासाठी खामगाव पोलिस विभागातर्फे डिस्टनशी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेता सामाजिक बांधिलकी म्हणून पोलीस विभागातर्फे शहरातील मेडिकल, डेअरी समोर ग्राहकांची एकच गर्दी होती तर या गर्दीमुळे संसर्गाचा प्रभाव होऊ नये, यासाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी अभिनव उपक्रम शहरातील मेडिकल व दूध डेअरीसमोर राबविण्यात येत आहे. या उपक्रमात शहरातील मेडिकल दुकानदार मालकांनी स्वतः पुढाकार घेऊन सोशल डिस्टन चौकटी आखून सटाण्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन ठाणेदार सुनील आंबुलकर यांनी केले आहे. हा उपक्रम अप्पर पोलीस हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात आला आहे.