जामनेर, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे ठिकाण जळगाव, भुसावळ पाचोरा ही मोठी शहर जामनेर पासून जवळच आहेत. जामनेर तालुक्यात चेक नाक्यांवर चौकशी करूनच प्रवेश दिला जात आहे.
जामनेर येथील काही नागरिक कामानिमित्त शहरात व तालुक्यात ये-जा करतात. अशा प्रकारे जामनेर शहरासह तालुक्यात या कोरोना विषाणूचा फैलाव होवू नये व फैलाव रोखण्याचा प्रयत्न म्हणून नागरिकांच्या सुचविलेल्या सूचनांंचा विचार करून.जामनेर तालुका प्रशासनाने तालुक्यात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांंवर चेक नाके लावले आहेत. या नाक्यांवर बाहेरून येणाऱ्यांची पुर्ण काटेकोर चौकशी करूनच त्यांना तालुका हद्दीत प्रवेश दिला जात आहे. यात बुलढाणाकडुन येणाऱ्या चोरट्या रस्त्यावर सुद्धा पोलिस व प्रशासनाचे लक्ष आहे. जामनेर-जळगाव, जामनेर-भुसावळ, जामनेर-फर्दापुर, जामनेर-देऊळगाव, जामनेर-फत्तेपुर या ठिकाणी पोलिस चेकनाके लावण्यात आले आहेत. सुदैवाने परिसरासह तालुक्यात आतापर्यंत तरी कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही म्हणून अगोदरच खबरदारी म्हणून तालुका प्रशासन हा पण प्रयत्न नागरिकांंच्या हितासाठी राबवत आहे.