जळगाव प्रतिनिधी । शब्बी बारात मुस्लिम बांधवाचा सण गुरूवारी ८ एप्रिल रोजी असल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह ट्रस्ट सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी कोरोना विषाणू संदर्भात जनजागृतीबाबत चर्चा करण्यात आली.
पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान एमआयडीसी पोलीस ठाण्यात ईदगाह ट्रस्टचे सदस्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. ही बैठक मुस्लिम बांधवाचा सण शब्बी बारात आणि कोरोना विषाणू संदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्ह्यासह राज्यात संचारबंदी लागू करण्यात आला असल्याने गुरूवारी ८ रोजी मुस्लिम बांधवांचा सण शब्बी बारात हा सण साजरा न करण्याचे आवाहन तथा सुचना देण्यात आल्यात. यावेळी ट्रस्टचे सदस्यांनी देखील प्रतिसाद देत ईदगाह मैदानावर कोणताही समाजबांधव जाणार नाही असे आश्वासन दिले.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००