बोदवड प्रतिनिधी । कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासकिय यंत्रणा सज्ज झाली आहे. शाळा, महाविद्यालये, शासकिय कार्यालय यांच्या पाठोपाठ आता धार्मिक स्थळांवरही बंदीचे सावट आले आहे. येथील शिरसाळा मारोती मंदीर भाविकांसाठी ३१ तारखेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी सर्वच गर्दीच्या ठिकाणांना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभुमीवर शिरसाळा मारोती मंदिर ट्रस्टला शासकिय पत्र प्राप्त झाल्यानंतर येत्या ३१ मार्चपर्यंत देवस्थान बंद वण्याचा निर्णय ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला. आपण सद्ध्या कोरोनाच्या फेज 2 मध्ये आहोत. फेज 2 मधून फेज 3 मध्ये जाऊच नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आवश्यक ती खबरदारी सरकार घेत आहे.