भुसावळ, प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शेवटचे १४ दिवस जनता कर्फ्यू पाळून ‘भुसावळ पॅटर्न’ राबविण्याचे आवाहन डॉ. नितु पाटील यांनी केले आहे. वाचा त्यांचाच शब्दात भुसावळ पॅटर्नबाबत सविस्तर
मित्रहो, सर्वात आधी कोरोना विषाणूमुळे चिरशांती लाभलेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली….
मित्रहो,करोना विषाणू मुळे होणारा कॉविड-१९ हा आजार वुहान चायना पासून दि.३१ डिसेंबर २०१९ ला सुरू झाला आणि भुसावळा दि. २५ एप्रिल २०२० रोजी शनिवारी धडकला.भुसावल शहरात समता नगर ते शिवदत्त नगर पर्यंत करोना प्रादुर्भाव झाला असून आजतागायत ५४ संक्रमित,त्यात १२ नागरिकांना देवाज्ञा, १० नागरिक करोना मुक्त, ३२ रुग्णांवर उपचार चालू आहेत आणि संपूर्ण भुसावल शहरात १० कंटेंटमेन्ट झोन तयार झाले आहेत. (दि.२७ एप्रिल संध्याकाळी ६.०० पर्यंत)
भारत सरकारने दि.२२ मार्च ला “जनता कर्फ्यू” यशस्वी झाल्यानंतर
पहिला लॉक डाऊन दि.२५ मार्च ते १४ एप्रिल २०२०
दुसरा लॉक डाऊन दि.१५ एप्रिल ते ३ मे २०२०
तिसरा लॉक डाऊन दि.४ ते १७ मे २०२०
चौथा लॉक डाऊन दि.१८ ते ३१ मे २०२०
आणि बहुतेक
पाचवा लॉक दि.1 जून ते ……
ही सर्व तारीख नुसार उजळणी यासाठी की भुसावळ शहरात दुसऱ्या लॉक डाऊनच्या शेवटी शेवटी दि.२५ एप्रिल ला पहिला रुग्ण सापडला नंतर आजच्या घडीला ५४ संक्रमित झाले आहेत. अर्थात २२ दिवसात ५४ म्हणजे दिवसाला जवळपास २ संक्रमित होत आहेत, ही नक्कीच धोक्याची घंटा आहे.
कॉविड-१९ ह्या आजारावर संपूर्ण जगात कोणताही ठोस उपचार नाही, औषध नाही, लस नाही, इंजेक्शन नाही शिवाय कोणतेही तंत्र, मंत्र,धागेदोरे,काळी जादू नाही आणि कोणतीही बुवाबाजीपण नाही.
ह्या आजारापासून बचाव करण्यासाठी उपाय म्हणजे घरीच राहणे, गरज असल्यास बाहेर गेल्यावर योग्य ते सामाजिक अंतर राखणे, मास्क,सॅनिटीझर यांचा वापर करणे,यात सर्वात महत्त्वाचे आहे. ते ह्या आजाराची संक्रमण सायकल तोडणे, त्यासाठी निमूटपणे घरात बसणे हाच काय तो मूलमंत्र आहे.
भुसावळ मधील तमाम नागरिकांचे मी जाहीर आभार मानतो, आज प्रत्येक भुसावळकर हा त्याच्या त्याच्या परीने ह्या लढ्यात सहभागी असून करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मदत करत आहे, आणि विशेष आभार यासाठी की दुसऱ्या आणि तिसऱ्या लॉक डाऊनमधील शेवटचे ४,४ दिवस सर्वांनी उत्स्फूर्तपणे संचारबंदी पाळली, यशस्वी केली…!
मित्रहो, आता हा कोरोना संक्रमित आकडा अजून कमी करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि माझ्या मते हा आता शेवटचा प्रयत्न होणार आहे. पुढील संपूर्ण १४ दिवस सलग उत्स्फूर्तपणे भुसावळ शहरामध्ये संचारबंदी राबवावी, या मताचा मी आहे. हा एक शेवटचा पर्याय असणार आहे. सर्वांनाच ४,४ दिवस असे ८ दिवसांचा संचारबंदीचा अनुभव पाठिशी आहे. तेव्हा एक शेवटचा जोर लावा आणि ” संपूर्ण १४ दिवस सलग संचारबंदी….!
ह्या संचारबंदी मध्ये दूध, दूध डेअरी (सकाळी ६ ते १०,संध्याकाळी ६ ते १०, मेडिकल( सकाळी ७ ते संध्याकाळी ७) रुग्णालय आणि संलग्न मेडिकल २४ तास (फक्त अत्यावश्यक सेवा) बाजार बंद, लिलाव बंद, गल्ली बोळात हातगाडीवर भाजीपाला विकण्यासाठी राहील (सकाळी ६ ते संध्याकाळी ६ ) ( प्रशासनाशी चर्चा केल्यावर यात काही बदल करता येईल) बहुतेक रुग्णालय हे कंटेंटमेन्ट झोन मध्ये असून मोजकेच बाहेर आहेत, तेव्हा किमान ते तरी रुग्णसेवेसाठी तप्तर ठेयु या.
जान है तो जहान है, मनुष्य २१ दिवस अन्नाशिवाय जगू शकतो तर पाण्याशिवाय ३,४ दिवस जगू शकतो. आपण तर घरी राहणार आहोत. जे घर बांधण्यासाठी आपण आयुष्य वेचल, कर्ज काढल,आता त्याच घरात परिवारा सोबत आपल्याला राहायचे आहे. जे नागरिक स्थलांतर करत आहेत त्यांचे हाल पहा, कष्ट पहा, त्या लहान मुलांच्या वेदना पहा, दोन वेळा ज्यांची जेवणाची भ्रांत आहे पण घराच्या ओढीने ते पायी अथवा मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी जात आहेत. त्यामानाने आपले जीवन किती सुसह्य आहे, ८ दिवस आपण कळ काढली आता अजून शेवटचे १४ दिवस संचारबंदी यशस्वी करू या.. !
करोना संक्रमण साखळी तोडू या…!
यावर दुसरा उपाय म्हणजे नागरिकांमध्ये “Herd Imunnity” तयार करण्यासाठी प्रयत्न करणे. नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कोरोना बाधित तरुण नागरिकांमध्ये तयार करणे, त्यासाठी लॉक डाऊन उठवावे लागेल आणि परत सर्व व्यवहार सुरू करावे लागतील. पण सध्या शासन ह्या विचारात नाही तेव्हा उत्स्फूर्तपणे संचारबंदी हाच तो उपाय राहतो.. !
मी डॉ नितु पाटील माझ्या वैद्यकीय क्षमतेनुसार,अभ्यासानुसार आणि अनुभवानुसार सर्वांना हात जोडून विनंती करतो की १४ दिवस सलग संचारबंदी पाळू यात, हा शेवटचा प्रयत्न राहील. यानंतर जर शासनाला लॉक डाऊन राबवण्याची गरज पडल्यास मिलिटरी फोर्स बोलावल्याशिवाय पर्याय राहणार नाही. तेव्हा ती वेळ आपल्यावर नको.
एक आगळावेगळा “भुसावळ पॅटर्न” राबवण्यासाठी एकदिलाने सांघिक प्रयत्न करू या….!
कोरोना हारेगा !
भुसावल जितेगा !!
जय भुसावळ
डॉ. नितु पाटील,भुसावळकर
भ्रमण ध्वनी क्र. 8055595999