जळगाव प्रतिनिधी । दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे नियम पाळण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे आज जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून आज रविवार ३० ऑक्टोबर रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज दिवसभरात एकही बाधित रूग्ण आढळून आला नाही. आता जिल्ह्यात १० बाधित रूग्ण उपचार घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७७९ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १९२ बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५७७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.