Home आरोग्य कोरोना : आज जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण आढळला नाही

कोरोना : आज जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण आढळला नाही

0
34

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात एकही रूग्ण आढळून आला नसून दोन रुग्ण बरे झाले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

 

जळगाव‍ जिल्ह्यात एकही बाधित रूग्ण आढळून आले नाहीत. तर आज दोन रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७७० रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १७८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १५ रूग्ण सध्या विविध रूग्णालयात उपचार घेत आहे. आजपर्यंत २ हजार ५७७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली.


Protected Content

Play sound