कोरोना : अमळनेरात पोलीसांकडून गरजूंना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप

अमळनेर प्रतिनिधी । कोरोनाच्या पाश्वभूमीवर देशात संचारबंदी असतांना अनेक तळागाळातील महीला व पुरूषांना जिवनाआवश्यक वस्तू देण्यासाठी समाजसेवक समोर येत आहेत. अमळनेर शहरात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी रात्र दिवस मेहनत घेतांना पो. नि. अंबादास मोरे व त्यांची टिम घेत आहे.

समाजाचे आपण देणे लागतो या सामाजिक बांधीलकीतून समाजसेवा व मदत त्यांच्या रक्तात नसानसात आहे.असाच एक किस्सा अमळनेरचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या माणूसकी व औदार्य पणाचा. लॉकडाऊन मध्ये माणूसकीचे दर्शन पो.नि.अंबादास मोरे व कर्मचारी, संस्थान दर्शन आटोपून दगळी दरवाजाकडे जात असतांना मध्ये अगदी परिस्थिती असलेले लहान मुल, मुली, स्त्रिया जात असतांना गाडी पाहुन ते घाबरले व पळायला लागले. परंतु त्यांना थांबवून साहेबांनी गाडीतील गोडशेव, चिवडा असे पाकीट सगळ्यांना दिले. यातुन कर्तव्य दक्ष मोरे माणूसकीचे दर्शन घडविले. मनोज माळी यांनी हे पाहुन फोटो व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे व भरत यांना पाठवले. अहोरात्र कोरोनाचा महासंकटाला झुंज देणारे अमळनेर पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content