Home आरोग्य कोरोनावर बोगस औषधी बनवणारा पकडला

कोरोनावर बोगस औषधी बनवणारा पकडला


 

मुंबई : वृत्तसंस्था । मुंबई पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशात कारवाई करत कोरोनावर बोगस औषधी बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला बेड्या ठोकल्या.

 

महाराष्ट्रासह देशात कोरोनानं थैमान घातलं आहे. आरोग्याच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर दिला जात आहे. दुसरीकडे कोरोनाच्या आडून पैसे कमावण्यासाठी जीवघेणे कामं होताना दिसत आहे. असाच एक भयंकर प्रकार मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर समोर आला आहे.

 

३० मे रोजी एफडीएने कोरोनावर बोगस औषधी तयार केली जात असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. हिमाचल प्रदेशातील सोलन येथील मॅक्स रिलीफ हेल्थकेअर बोगस गोळ्यांचं उत्पादन करत असल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. मुंबईतील तीन औषधी वितरकांवर (ड्रग्ज डिलर) छापे टाकल्यानंतर ही माहिती हाती आली होती.

 

मॅक्स रिलीफ हेल्थकेअर अशी औषध निर्माता कंपनी अस्तित्वात नसल्याचं तपासातून समोर आलं. मालक सुदीप मुखर्जी याला पोलिसांनी अटक केली.  तपास करत असताना मिश्रा नावाची व्यक्ती एका खासगी प्रयोगशाळेत बोगस गोळ्या बनवत असल्याचं समोर आलं. मिश्रा कोरोनावरील औषधी तयार करून मुखर्जीकडे पाठवायचा. मुखर्जी ही औषधी इतरांना विकायचा, अशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव हाके यांनी दिली.

 

 

बोगस औषधी उत्पादन आणि विक्री प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांनी जवळपास २२ लाख किंमतीची ओषधी मुंबईत विकली. होलसेल पुरवठा करणाऱ्या कंपनीवर पोलिसांनी छापा टाकला आणि औषधी जप्त केली. नोएडा आणि मेरठमधील कंपन्यांचाही यात सहभाग असून, तपास सुरूच असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 


Protected Content

Play sound