नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रतिकारासाठी देशभरात लॉकडाऊन असतांना टोल नाक्यावर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना विलंब होऊ नये म्हणून तात्पुरती टोलमाफी करण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात टोल नाक्यांमुळे काही प्रमाणात विलंब होत आहे. या पार्श्वभूमिवर, नितीन गडकरी यांनी घेतलीय. अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वेळेवर व्हावा यासाठी देशातील सर्व टोल नाक्यांवरील वसुली बंद करण्यात येत असल्याचं गडकरींनी जाहीर केलंय. यामुळे अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात होणार विलंम कमी दूर होईल अशी अपेक्षा गडकरींनी व्यक्क केली.
हा निर्णय तात्पुरता घेण्यात आला आहे. तसंच टोल वसुली बंद झाली असली तरी रस्त्यांचे दुरुस्तीचे काम थांबणार नाही. तसंच टोल नाक्यांवरील सर्व सेवा यादरम्यान सुरू राहणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे.
In view of Covid-19, it has been ordered to temporarily suspend the collection of toll at all toll plaza across India. This will not only reduce inconvenience to the supply of emergency services but also save critical time. #IndiaFightsCorona
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) March 25, 2020