कोरोनाने मृत पावलेल्यांना लाकूड मोफत द्या : भाजपा जिल्हाध्यक्ष सुर्यवंशी यांची मागणी

 

 

जळगाव, प्रतिनिधी ।  शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे. बऱ्याच लोकांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असून बरेच जन कोविडमुळे मृत्युमुखी पडत आहे. तरी म.न.पा. मार्फत स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लाकडे मोफत देण्यात यावेत अशी मागणी भाजपा  जिल्हाध्यक्ष  दिपक सुर्यवंशी यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

महापालिका अंतर्गत सी.सी.सी सेंटर येथे डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली कोरोना बाधित  रुग्ण उपचार घेत असून सध्या जळगाव शहरात पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. अश्या परिस्थितीत जळगाव शहरात सर्व खाजगी रुग्णालये फुल असून शहरातील नागरिकांचे ऑक्सिजन बेडसाठी अतोनात हाल होत आहे. तरी अश्या गंभीर अवस्थेत सुद्धा महापालिकेच्या  सी.सी.सी. सेंटरला डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून सुद्धा तेथे ऑक्सिजन बेडची व्यवस्था होत नाही. तरी आपण सी.सी.सी. सेंटरला किमान ५० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करावी अशी मागणी नुकतीच केली आहे. याप्रसंगी आ. राजूमामा  भोळे,   महापालिका स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, गटनेते भगत बालाणी,  जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी,  महेश जोशीं उपस्थित होते.

 

Protected Content