जळगाव, प्रतिनिधी । सोमवारी चोपड़ा तालुक्यातील विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी कामगार व उत्पादन शुल्क विभाग मंत्री दिलिप वळसे पाटील यांचा नियोजित दौरा होता. परंतु, वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा तहकूब करण्यात आला असल्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी कळविले आहे.
सोमवार २२ फेब्रुवारी रोजी चोपडा न. प. व तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन मंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र, राज्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होतांना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा पूर्व नियोजित दौरा तहकूब करण्यात आला असल्याचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी कळविले आहे.