नवी दिल्ली । देशभरातील नागरिकांसाठी सरकारी आणि खासगी या दोन्ही प्रकारातील कोरोनाच्या चाचण्या मोफत उपलब्ध करून देण्याचे निर्देश आज सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
शशांक देव सुधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने आज केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या सर्व प्रयोगशाळा मग त्या सरकारी असो की खासगी या ठिकाणी करोना व्हायरसची चाचणी मोफत करण्यात यावी, असेे स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने तात्काळ यासंबंधी आदेश जारी करावेत, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अॅण्ड कॅलिब्रेशन लॅब्रोटरीज परवानगी असलेल्या प्रयोगशाळा किंवा WHO आणि ICMR ने मंजुरी दिलेल्या सर्व प्रयोगशाळांमध्ये करोनाची चाचणी मोफत करावी, असं सुप्रीन कोर्टाने म्हटलंय. दरम्यान, करोनाचा रुग्णांना आवश्यक ती सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी ही सरकार आणि पोलिसांची आहे. करोना रुग्ण होम क्वारंटाइन असल्यावर किंवा वैद्यकीय पथकांकडून जिथे त्यांचे स्क्रिनिंग करण्यात येत आहे तिथे रुग्णांना सुरक्षा पुरवावी, असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिलेत. तसेच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यामुळे सरकार आणि पोलीस प्रशासनाने त्यांना सुरक्षा पुरवावी, असं सु्प्रीम कोर्टानं म्हटलंय.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००