पुणे प्रतिनिधी । येथे एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असणार्या परदेशी नागरिकांना करोनाची लागण झाल्याची अफवा सोशल मीडियावरून पसरविल्या प्रकरणी एकाविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये उतरलेल्या परदेशी पाहुण्यांना करोनाची लागण झाल्याची अफवा त्याने सोशल मीडियावरून पसरविली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर हा मेसेज खोटा आणि खोडसाळ असल्याचं आढळून आलं. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अफवा पसरविणार्याचा शोध घेतला जात असून त्याला अटक करण्यात येणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाबाबत अफवा पसरवणार्याच्या विरोधात हा राज्यातील पहिला गुन्हा असल्याचे मानले जात आहे.