रोम (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसने जगभरासह इटलीत हाहाकार माजवला आहे. एकट्या इटलीमध्ये एका दिवसात ९७० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असल्यामुळे प्रचंड भीतीची वातावरण पसरले आहे.
इटलीनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले असून, एका दिवसात ५६९ लोकांचा मृत्यू झाला. यासह येथे एकूण मृत्यूची संख्या ४,९३४ वर गेली आहे. दुसरीकडे अमेरिकेतही कोरोनाबधितांचा आकडा एक लाखांच्यापार पोहोचला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १५४४ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात अमेरिकेत सुमारे १८ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ३४५ जणांचा मृत्यू झाला आहे.