Home आरोग्य कोरोनाचा कहर: राज्यात ११७ नवे रूग्ण; एकुण २८०० चा आकडा पार

कोरोनाचा कहर: राज्यात ११७ नवे रूग्ण; एकुण २८०० चा आकडा पार


मुंबई वृत्तसंस्था । देशात १२ दिवसांचा लॉकडाऊन पुकारल्यानंतर देखील रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती अधिकच बिकट असून येथील रुग्णांची संख्या आतापर्यंत २८०१ वर पोहोचली आहे.

राज्यात आज ११७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात एकट्या मुंबईतील ६६ रुग्णांचा समावेश आहे. तर, पुण्यातही आकडा वाढत असून आज आणखी ४४ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय, ठाणे ३, मीरा-भाईंदरमधील २, वसई-विरार व पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाली आहे.


Protected Content

Play sound