नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या कहरमुळे पश्चिम महाराष्ट्रातील ४४ जण इराणमध्ये अडकले असून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना एक पत्र लिहिले आहे.
श्रीनिवासन पाटील यांनी सांगितले की, कोरोनामुळे सांगली, कोल्हापूर आणि सातारा परिसरातील ४४ लोक इराणची राजधानी तेहरीन येथे गेल्या २२ फेब्रुवारीपासून अडकून आहेत. याबाबत कोल्हापूरचे रहिवासी असलेल्या मोमीन यांनी माझ्याशी संपर्क साधला असून मदतीची मागणी केली. त्यावर आपण पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. पंतप्रधान कार्यालयाने माझ्या पत्राला उत्तर देताना सांगितले की, या सर्व लोकांना भारतात परत आणण्यापूर्वी तेहरीनमध्येच इराण सरकार एक प्रयोगशाळा उभारून तिथे त्यांची तपासणी करणार आहे. त्यानंतर खास विमानाने त्यांना भारतात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.