Home Cities मुक्ताईनगर कोरोनाग्रस्तांसाठी आ. चंद्रकांत पाटील देणार एका महिन्याचा पगार !

कोरोनाग्रस्तांसाठी आ. चंद्रकांत पाटील देणार एका महिन्याचा पगार !

0
48

मुक्ताईनगर प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी आमदार चंद्रकांत पाटील आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार असून त्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

सध्या कोरोनाच्या प्रतिकारासाठी केंद्र व राज्य सरकार आटोकाट प्रयत्न करत आहेत. यासाठी तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमिवर, आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. त्यांनी आपल्या महिनाभराचे वेतन हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचे जाहीर केले आहे. ते तहसीलदारांना पगाराच्या रकमेचा धनादेश लवकरच देणार आहेत.


Protected Content

Play sound