कोरेगाव भीमासह मराठा आंदोलनातील एकूण ८०८ गुन्हे मागे : गृहमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) कोरेगाव भीमा आणि मराठा आंदोलनातील एकत्रित ८०८ गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधान परिषदेत दिल्ली.

 

कोरेगाव भीमा प्रकरणातील 649 पैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आली आहेत. तर मराठा आंदोलनातील 548 पैकी 460 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. या अधिवेशनादरम्यान सुरु असलेल्या चर्चेत अनिल देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी 649 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. उर्वरित गुन्हे मागे घेण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. मात्र, सार्वजनिक मालमत्तेवर आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांमधील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. याशिवाय नाणार आंदोलनातील 3 गुन्हे मागे घेतले असून शेतकरी आंदोलनातील गुन्हेदेखील मागे घेऊ, अशी ग्वाही अनिल देशमुख यांनी दिली.

Protected Content