कोणी चंपा, टरबुज्या म्हटले तर चोख प्रत्युत्तर द्या ; चंद्रकांत पाटील याचे कार्यकर्त्यांना आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) कोणी चंपा म्हणतं, तर कोणी टरबुज्या, मात्र आता कुठल्याही नेत्यावर केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर द्या, असे आदेशच चंद्रकांत पाटील यांनी कार्यकत्यांना दिले आहेत. सोमवारी पार पडलेल्या भाजपच्या पहिल्या प्रदेश कार्यकरिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

 

 

यावेळी पुढे बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या तीन पक्षांच्या ट्रोलर्सकडून सोशल मीडियावर अर्वाच्च भाषेत आपल्या नेत्यांवर टीका केली जाते. मागील काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून एका कार्यकर्त्याने तर कुत्र्याची उपमा दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यानंतर भाजपची सोशल मीडिया यंत्रणा अॅक्टिव्ह करुन दोन तासात हे वक्तव्य मागे घेण्यास भाग पाडले, अशा पद्धतीने आक्रमकपणे पलटवार करण्याचा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापुढे कुठलीही टीका खपवून न घेण्याच्या सूचना भाजप कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

Protected Content