जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोठारी नगर परिसरात वटपौर्णिमा निमित्त पर्यावरण सखी मंचच्या सामाजिक कार्यकर्त्या नेहा जगताप यांच्या वतीने परिसरात वडाचे वृक्षारोपण करण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की, वटपौर्णिमा निमित्त आज शहरातील कोठारी नगरात सखी मंच जळगाव शहरच्या वतीने आज वडाच्या झाडांचे रोप लावण्यात आले. वृक्षारोपण करून वायू प्रदुषणमुळे होणारे आजारावर मात करता येणार आहे. सध्या कोरोना काळात सर्वांना ऑक्सीजनचे महत्व कळाले आहे. याप्रसंगी महिला पर्यावरण सखी मंच जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष मनिषाताई पाटील यांची प्रमख उपस्थिती होती.