Home Cities जळगाव कॉंग्रेसतर्फे श्रीराम रथोत्सवानिमित्ताने ‘साबुदाणा खिचडी’ वाटप

कॉंग्रेसतर्फे श्रीराम रथोत्सवानिमित्ताने ‘साबुदाणा खिचडी’ वाटप

0
24

जळगाव, प्रतिनिधी | ‘कार्तिकी एकादशी’ व जळगाव शहराचे आराध्य दैवत ‘श्रीराम रथोत्सव’ निमित्ताने काँग्रेस भवन येथे आलेल्या भाविकांना ‘साबुदाणा खिचडी’ वाटप करण्यात आले.

 

‘कार्तिकी एकादशी’ व जळगाव शहराचे आराध्य दैवत ‘श्रीराम रथोत्सव’ व जळगाव शहराचे पदाधिकारी रवी चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त, काँग्रेस भवन येथे आलेल्या भाविकांना शहराध्यक्ष श्यामभाऊ तायडे यांच्या हस्ते ‘साबुदाणा खिचडी’चे  वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रदीप सोनवणे, सुभाष पाटील, ज्ञानेश्वर कोळी, शशी तायडे, शफी बागवान, मनोज सोनवणे, मालोजी पाटील, नारायण राजपूत, उमेश तायडे, महेंद्रसिंग पाटील, रविंद्र भंगाळे, प्रमोद घुगे, निनाजी गायकवाड, मिराबाई सोवणे, मिनाबाई जावळे, प्रतिभा रोटे, रेखा सोनार, जरीना शेख इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound