कैलास सोनवणे यांच्याविरुद्ध उपायुक्तांची तक्रार ; पत्नीच्या चारित्र्यहननासह शिवीगाळचा आरोप

 

जळगाव (प्रतिनिधी) तुला अजुन मी मारले नाही, पण ठरवले तर नक्कीच मारेल. तसेच माझ्या पत्नीनेचे चारित्र्यहनन होईल, अशी शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार मनपा उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांनी आज भाजप नगरसेवक कैलास सोनवणे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस स्थानकात दिली आहे.

 

उपयायुक्त दंडवते यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलेय की, दिनांक १६ मार्च रोजी रात्री नऊ ते सव्वा नऊ वाजेच्या सुमारास मनपाचे स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी मला त्यांचा मोबाईल क्रमांकावरून माझ्या मोबाईलवर फोन केला. यावेळी त्यांनी साफसफाईचे काम करणारी वॉटर ग्रेस कंपनी ही उद्या काम सुरू करत आहे, अगर कसे? याबाबत मला विचारले. यावर मी त्यांना कंपनीचा मनपा कर्मचाऱ्यांकडे काम सुरू करणे बाबत निरोप आल्याबाबत सांगितले. तेव्हा त्यांनी ते उद्या टीबी सॅनीटोरीयममध्ये असलेल्या मनपाचे वाहनतळ येथे येणार असून तुम्हीही तेथे येण्याबाबत सांगितली. त्यावर मी त्यांना होकार दिला. त्यानंतर वॉटर ग्रेस कंपनीच्या काम सुरू करण्याबाबतचा निरोपा संदर्भात मी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याशी रात्री दहा वाजता दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यांनी मला सदर ठिकाणी जाऊन पुरेशी यंत्रणा असल्यास काम सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना केली होती.

त्यानुसार दुसऱ्या दिवशी मनपा वाहनतळ येथे घंटागाड्या यांच्या कामाच्या नियोजनासाठी सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास सहाय्यक आयुक्त प्रणव पाटील, आकाश डोईफोडे यांच्यासह गेलो. सदर ठिकाणी महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती सूचित आहाडा, मनपाचे स्वीकृत सदस्य कैलास सोनवणे व अन्य दोन ते तीन नगरसेवक तसेच मनपाचे मनपाचे सॅनिटरी इन्स्पेक्टर कांबळे, श्री.किरंगे, श्री. अत्तरदे व अन्य सहाय्यक कर्मचारी, मनपाचे सुमारे ३० ते ३५ वाहनचालक, खासगी ठेकेदारांचे सुमारे ७० वाहनचालक व मनपाचे बांधकाम विभागातील ठेकेदारी वाघ हे उपस्थित होते. सदर ठिकाणी मी उभा असतांना कैलास सोनवणे हे माझ्याशी मोठ्या आवाजात बोलून महापौर श्रीमती भारती सोनवणे व स्थायी समिती सभापती शुचिता हाडा यांना बाजूला उभे राहण्यास सांगून मला उद्देशून तुला मी बघूनच घेतो तसेच माझ्या पत्नीबाबत अश्लील बोलले. मी त्यांना वाईट शब्द वापरू नका, असे सांगितले. परंतू त्यांनी मला उद्देशून सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, अशी शिवीगाळ करून माझ्या पत्नीचे चारित्र्यहनन करून बदनामी केली व मला मारण्याची धमकी देऊन सरकारी कामात अटकाव केल्याचे म्हटले आहे.

Protected Content