जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात ९ ते १५ मे पर्यंत न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि ऍक्रेडिटेशनच्या अनुषंगाने शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी ऑनलाईन कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेचे आयोजन केसीई अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय आणि मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंटचे गुरु अंगद देव टीचिंग लर्निंग सेंटर ने संयुक्तपणे केले. या कार्यशाळेमध्ये देशभरातून 105 प्राध्यापकांनी आपला सहभाग नोंदविला. देशाच्या विविध भागातील तज्ञ डॉ. एन पंचनाथम, डॉ. ए. जी. ठाकूर, डॉ. विठ्ठल बांदल, प्रा. डॉ. अनिल डोंगरे, प्रा. डॉ. अरुण जुल्का, प्रा. डॉ. पी. जे. पवार, विद्यार्थी शिवराज भोसले व आर्य येलुरे यांनी मार्गदर्शन केले. कार्य शाळेच्या निरोप समारंभासाठी ओरिएंटल युनिव्हर्सिटी इंदोर चे व्हॉइस चान्सेलर डॉ. सुनील सोमानी यांनी उपस्थिती दिली. ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, उपप्राचार्य प्रा. संजय दहाड आणि अकॅडमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार, गुरु अंगद देव टीचिंग लर्निंग सेंटरचे चेअरमन प्रा. डॉ. ए. के. बक्षी, प्रोजेक्ट हेड प्रा. डॉ. विमल रार यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रम समन्वयक म्हणून व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा. हर्षा देशमुख यांनी काम केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. दिगंबर सोनवणे, प्रा. शेफाली अग्रवाल, प्रा. हेमंत धनंधरे, प्रा. कोमल जैन आणि अशोक काळे यांनी परिश्रम घेतले.