केळी व्यापाऱ्याची ट्रक विक्रीत ७ लाखांची फवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केळी व्यापाराच्या दोन ट्रक यांची परस्पर विक्री करत सुमारे ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या संदर्भात मंगळवार ११ एप्रिल रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील सावदा येथील व्यापारी देविदास सिताराम राठोड (वय-३७) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून केळी खरेदी विक्रीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असतात त्यांच्याकडे टाटा कंपनीच्या बारा टायर असलेल्या ट्रक आहेत. यापैकी (एमएच १९ झेड ६९५५) हा ट्रक त्यांनी ब्रिजेशकुमार प्रकाश यादव रा. सावदा ता. रावेर याला ३१ जानेवारी २०२३ रोजी जळगाव शहरातील आरटीओ कार्यालयात जाऊन आटीओ एजंट शहादत अली यासीन अली रा. फैजपूर यांच्या मदतीने मुळ कागदपत्रांची पूर्तता करून ट्रक हा ब्रिजेशकुमार प्रकाश यादव यांच्या नावाने केला.  दरम्यान १९ फेब्रुवारी रोजी देविदास राठोड यांनी ट्रक विक्री केल्याबाबतचे स्टेटस ऑनलाइन चेक केले असता त्यांनी विक्री केलेला (एमएच १९ झेड ६९५५) हा ट्रक ब्रिजेशकुमार यादव यांचे नावावर नसल्याचे दिसून आले तर हा ट्रक अब्दुल रशीद अब्दुल अजीज रा. मालेगाव याच्या नावावर दिसून आला. त्याचप्रमाणे त्यांचा दुसरा ट्रक (एमएच १९ झेड ७०५५) याचे देखील स्टेटस चेक केले असता हा ट्रक ब्रिजेशकुमार प्रकाश यादव यांच्या नावावर दिसून आला. दरम्यान आपण एकच ट्रक विक्री केला असून दोन ट्रक वेगवेगळ्या नावावर दिसून आल्याने व्यापारी देविदास राठोड यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार मंगळवार ११ एप्रिल रोजी देविदास राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी ब्रिजेशकुमार प्रकाश यादव रा. सावदा ता. रावेर आणि आरटीओ एजंट शहादत अली यासीन अली रा. फैजपूर या दोघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील करीत आहे.

Protected Content