पुणे प्रतिनिधी । केळी पीक विम्यावरून शेतकरी त्रस्त झाले असतांना यासाठी दिवंगत हरीभाऊ जावळे यांनी केलेल्या प्रयत्नांचे आज माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्मरण केले. शेतकरी संवाद यात्रेत त्यांनी हरीभाऊ जावळे यांच्यामुळे मिळत असलेला केळी विम्याचा लाभ यंदा न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली.
आज शेतकरी संवाद यात्रेच्या दरम्यान भाषण करतांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, राज्य सरकारच्या अनास्थेमुळे पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. आमचे दिवंगत सहकारी हरीभाऊ जावळे हे केळीमध्ये तज्ज्ञ होते. त्यांनी शेतकर्यांना अनुकुल ठरतील असे निकष तयार केले. यानुसार टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. परिणामी केळी उत्पादकांना पीक विम्याचा लाभ मिळाला होता. तथापि, यंदा निकष बदलल्यामुळे उत्पादकांना विम्याचा लाभ तर मिळालाच नाही, पण यासोबत आपत्तीमुळे हानी होऊन देखील त्यांना मदत मिळाली नसल्याबद्दल त्यांनी टीका केली. या माध्यमातून फडणवीस यांनी दिवंगत माजी खासदार व आमदार हरीभाऊ जावळे यांच्या कार्याचे स्मरण केले.
खालील व्हिडीओत पहा देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/508992935887325/videos/3476489265799513