दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीत सलग तिसऱ्यांदा विजय मिळविल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्र निर्माणासाठी आपमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन करणारे पोस्टर दिल्लीत लागल्यामुळे अरविंद केजरीवाल आता राष्ट्रीय पातळीवर भाजपला आव्हान देण्याच्या तयारीत असल्याची चर्चचा सुरु झाली आहे.
दिल्लीत राष्ट्र निर्माणासाठी आपमध्ये सहभागी व्हा असे आवाहन करणारे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात आप हा पक्ष आपल्या रुपाने मतदारांसमोर भाजपला पर्याय उभा करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्र निर्माण याचाच अर्थ लोकसभा निवडणुकीत आप हा पक्ष एक नवा पर्याय म्हणून समोर येऊ शकतो. दिल्लीत झालेल्या सलग दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत आपने भाजपाचा पराभव केला आहे. त्यामुळे ‘आप’ ला रोखण्याचे मोठे आव्हान भाजपासमोर असणार आहे.