Home धर्म-समाज केओएम इंग्लिश मीडियम स्कूलमधे गुरुपौर्णिमा उत्साहात .

केओएम इंग्लिश मीडियम स्कूलमधे गुरुपौर्णिमा उत्साहात .


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव येथील अमीर प्रतिष्ठान संचलित केओएम इंग्लिश मीडियम स्कूल किनगाव, येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

 

यावेळी स्कुलच्या आवारात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजीत गुरूजनांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  शाळेतील संस्थेचे सचिन तडवी होते , या प्रसंगी यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरूवातीस सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले .सचिन तडवी गुरुपौर्णिमेबद्दल आपले मनोगत विद्यार्थ्यां समोर सादर केले .

 

गुरूपौर्णिमा ही एक परंपरा आहे जी सर्व अध्यात्मिक व शैक्षणिक गुरूंना समर्पित आहे गुरू हे उत्क्रांत किंवा प्रबुद्ध मानव मानले जातात जे कर्मयोगावर आधारीत त्यांचे ज्ञान आपल्या शिस्याला देतात गुरूपौर्णिमा हा सण आपल्या देशासह ईतर देशात देखील साजरा करण्यात येतो , एक आदर्श शिक्षक व आदर्श विद्यार्थी हा कसा असावा हे देखील सचिन तडवी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले .

 

गुरुपौर्णिमा कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गणेश मेश्राम ,शिक्षीका जयश्री चौधरी ,कलिमा तडवी यांचा सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत गुरुजनांचा सत्कार करण्यात आले या कार्यक्रमास मान्यवर मंडळीसह शाळेचे कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार शिक्षीका कल्पना तायडे यांनी मानले .


Protected Content

Play sound