https://wp.me/p7A6NV-sEr
जळगाव, प्रतिनिधी । संयुक्त किसान मोर्चातर्फे दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारने पारित केलेले ३ शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे, यासाठी लोकसंघर्ष मोर्चातर्फे कृषी विधेयकांचे जाहीर दहन करण्यात आले.
लोकसंघर्ष मोर्चातर्फे जळगाव शहरातील टॉवर चौकात उद्या दि. १६ जानेवारी रोजी, संध्याकाळी ५ वाजता केंद्र सरकारच्या ३ कृषी विधेयकांचे जाहीर दहन करण्यात येणार आहे. तसेच दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते रेल्वे स्टेशन पर्यंत आदिवासी शेतकरी व शेतमजूर यांची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. रॅली ची सांगता झाल्यानंतर सुमारे १२०० शेतकरी दिल्ली येथील कृषी आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहे. तेव्हा जळगाव जिल्ह्यातील तमाम बुद्धिवादी प्रगतिशील विचारांच्या नागरिकांनी तसेच महिला , विद्यार्थी युवकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिभाताई शिंदे , मुकुंद सपकाळे , सचिन धांडे , अमोल कोल्हे , फारुख शेख , सुरेंद्र पाटिल , प्रमोद पाटील , यांनी केलेले आहे