जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांची सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्यावतीने जिल्हा समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे.
सीबीएसई बोर्ड संबंधित ऍफ्फिलिएशन झालेल्या शाळांच्या संदर्भात महत्त्वाच्या कामांची अंमलबजावणी त्या पार पडतील. याच अनुषंगाने जिल्हास्तरीय एका प्रतिनिधीची नेमणूक केली जाते की जो बोर्डाकडून वेळोवेळी प्रसारित झालेले जीआर व इतर माहीती इतर शाळापर्यंत पोहोचवून त्यानुसार आवश्यक ती माहिती त्यांच्याकडून एकत्रित करून सीबीएसईबोर्ड पर्यंत पोहोचते तसेच त्याच संदर्भात इतर शाळांच्या प्रतिनिधींशी सुसंवाद साधून कामगिरी पार पाडली जाते . याच कार्यासाठी ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांची सीबीएसई बोर्ड तर्फे नेमणूक करण्यात आलेली आहे .सीबीएसई बोर्ड कडून अतिमहत्वाच्या जबाबदारीच्या पदासाठी प्राचार्या सुषमा कंची यांची निवड होणे ही खरोखरच के.सी.ई. सोसायटीच्या दृष्टीने गौरवास्पद बाब आहे असे उद्गार याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी व्यक्त केले त्याचबरोबर अध्यक्षांनी व संस्थेच्या इतर सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना महत्वपूर्ण कामगिरीच्या यशस्वीतेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत.