केंद्रीय मंत्री जनआशीर्वाद यात्रा काढणार

 

 

नागपूर:  वृत्तसंस्था । आता 17 ते 22 ऑगस्ट दरम्यान नव्यानं निवड झालेले राज्यातील केंद्रीय मंत्री जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

 

चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजपचे प्रमुख नेते चार दिवस दिल्लीत होतो. सरकारच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकासाठी करायची काम आणि दुसरीकडे पक्ष संघटन मजबूत कसं होईल, 50 टक्क्याची लढाई कशी होईल, भाजप मजबूत कशी राहिल यासंदर्भात हा दिल्ली दौरा होता, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

 

 

 

केंद्र सरकारच्या योजना समाजापर्यंत पोहोचवण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. नव्या मंत्र्यांना त्याच्या क्षेत्रात दौरे करण्यास सांगण्यात आलंय, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले . 17 ते 22 तारखे दरम्यान जनआशीर्वीद यात्रा काढण्यात येणार आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजप तीन पक्षांविरोधात एकटा लढला तरी 51 टक्केची लढाई करुन आमचा पक्ष मजबूत राहिलं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमुळे मनसेसोबतच्या युतीसंदर्भात चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवी दिल्लीतील बैठकीत मनसे सोबतच्या युतीचा विषय अजेंड्यावर नव्हता, हा विषय स्थानिक पातळीवरचा असल्याचं त्यांनी म्हटलंय.

 

महाराष्ट्रातील नव्याने झालेल्या चार केंद्रीय मंत्र्यांवर ‘जनआशीर्वाद यात्रे’ची जबाबदारी सोपवण्यात आलीय. नारायण राणे आणि कपिल पाटील कोकण, ठाणे मुंबईत यात्रा काढणार आहेत. तर, भागवत कराड मराठवाड्यात जनआशिर्वाद यात्रा’ काढणार आहेत.

 

दिल्लीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व खासदारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्यात. भाजपचे प्रदेश सरचीटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ही बाब मान्य केलीय.

 

Protected Content