धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला १५० वर्षात पदार्पण केल्या निमित्त कृष्णा गीता नगर येथे राष्ट्रपिता जोतीराव फुले व विद्येचे खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे बाल- गोपालांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
कृष्ण गीता नगरचे रहिवासी पी.डी.पाटील सर यांनी राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांचे जीवन कार्य सांगून सत्यशोधक समाजाविषयी बाल – गोपालांना माहिती दिली. कृष्णा गीता नगर मधील बालगोपालांनी दसऱ्याच्या दिवशी तात्यासाहेब व माईंचे चित्र रंगून रंगभरण स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला.
यामध्ये रोहन जगदीश पवार, रोहित महेंद्र सैनी, हर्षल प्रमोद पाटील, इशिता सुनील कोळी, संकेत प्रमोद पाटील, श्रेयस जगदीश पवार, तनिष्का महेंद्र सैनी, आदिती सुनील कोळी यांचा समावेश होता. शेवटी सर्व बालगोपालांना दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.