जळगाव प्रतिनिधी । जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी दिली आहे.
केंद्रातील भाजप सरकारने संसदेत शेतकरी व कामगारविरोधी कायदा मंजूर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय करणारा कायदा अमलात आणण्याचा अघोरी प्रयत्न करीत आहे. हा अन्यायकारक कायदा लागू करू नये, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी दिली आहे.
भाजप सरकारने संसदेत हिटलरशाही पद्धतीने शेतकरी विधेयक मंजूर करून लोकशाहीचा खून केला आहे. या कायद्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होऊन देश मोठ्या संकटात सापडेल. म्हणून केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदा तत्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार असून महात्मा गांधी जयंती निमित्त ‘मजदूर बचाव दिवस’ पाळला जाणार अाहे. प्रत्येक तालुकास्तरावर हे आंदोलन केले जाणार आहे.